Search

महिला सम्मान योजना 2023 माहिती

 महिला सम्मान बचत पत्र योजना 



सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक योजना 

महिला सम्मान बचत पत्र योजना 

महिला सम्मान बचत पत्र योजना  ? 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशाच्या अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी 2023-2024 च्या बजेट मध्ये महिला सम्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. 

ही  योजना महिलांना लहान गुंतवणुक करण्यासाठी प्रोत्साहन देते. या योजनेच्या माध्यमातून महिला व मुलीच्या नावाने महिला सम्मान बचत पत्र देण्यात येते. तसेच या योजनेमध्ये देशातील कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते.त्या साठी स्थानिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन महिला सम्मान बचत पत्र योजना मध्ये  गुंतवणूक ही करता येते. विशेष या योजने मध्ये वर्षाला 7.5% हे चक्रवाढ पद्धतीने देण्यात येते.तसेच रुपये 1000 हजार ते रुपये 2 लाखा पर्यंतची गुंतवणूक ही करू शकतो.  

Mahila Samman Bachat Patra Yojana Eligibility 
महिला सम्मान बचत पत्र योजना पात्रता 

  • गुंतवणूकदार ही भारताची नागरिक असावी. 
  • देशातील सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 
  • उत्पन्न मर्यादा ही 7 लाखाच्या आत 
  • या योजनेसाठी वयाचे बंधन नाही. 

Mahila Samman Bachat Patra Documents 
महिला सम्मान बचत पत्र योजनेसाठी लागणारे कागदपत्र 

  • आधारकार्ड 
  • पासफोर्ट साइज फोटो 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • राक्षण कार्ड 
  • रहिवाशी दाखला 
  • पॅन कार्ड 
  • जातीचे प्रमाणपत्र 


विशेष माहिती 
 
1) महिला सम्मान बचत पत्र योजने अंतर्गत बचत पत्र हे दिनांक 31/03/2025 पर्यंत घेत येतील 

2) बचत पत्राची मुदत ही 2 वर्ष राहील. 

3) एका महिलेच्या नावावर कमाल रुपये दोन लाखापर्यंत किती ही बचतपत्र घेता येतील पण दोन बचतपत्रातील अंतर हे 3 महिन्याचे असले पाहिजेत. 

4) व्याजदर हा 7.5% प्रती वर्ष एवढा असून व्याज हे चक्रवाढ पद्धतीने आकरले जाईल. 

5) एक वर्षा नंतर 40 % रक्कम ही एकदाच काढता येईल. 

6) अपवादात्मक परिस्थिती शिवाय खाते मुदत पूर्व बंद करता येणार नाही. 




आधिक माहिती साठी स्थानिक पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी करा.. 

अशाच आणखी योजनांच्या माहिती साठी खाली दिलेल्या योजनांवर क्लिक करा. 

सुकन्या समृद्धी योजना माहिती 


लेक लाडकी योजना


धन्यवाद .. 

Mahila Samman Yojana 2023 Calculator | महिला सम्मान बचत पत्र योजना 2023 | महिला सम्मान योजना महाराष्ट्र | महिला सम्मान योजना 2023 | Mahila Samman Saving Certificate Scheme 2023 | mahila samman yojana calculator | महिलांसाठी योजना महाराष्ट्र 2023







पीएम किसान सम्मान निधि योजना |e-KYC ऑनलाइन कशी करावी | PM किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी

 पीएम किसान सम्मान निधि योजना


पीएम किसान सम्मान निधि

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना ही भारतसरकार ने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6000 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येतो.मुख्यतः ही योजना कृषि क्षेत्रातीला मिळावी व त्यामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेद्वारा पात्र लाभार्थ्यांना 2000 हजार रुपये प्रमाणे 3 हप्ते दिले जातात. एकुण एकावर्षात 6000 हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ हा पूर्णतः केंद्र सरकारद्वारा देण्यात येतो.  
 
पीएम किसान योजना ही केंद्रसरकारच्या कृषी आणि कल्याण मंत्रालया मार्फत दिनांक 01.12.2018  रोजी सुरू करण्यात आली. शेतकरी कुटुंबाला या योजनेचा लाभ हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येतो. 


योजनेचे अपात्रतेचे निकष 

खालील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसणार आहे. 

1) सर्व संस्थात्मक जमीनधारक 

2) अशी शेतकरी कुटुंब जे खालील एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहे. 

  • सांविधानिक पद धरण करणारे. केलेले आजी/माजी 
  • आजी/माजी,मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य,आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य,आजी/माजी महानगर पालिकेचे महापौर,आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष 
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी,शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थेचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी/कर्मचारी 
  • चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून 
  • सर्व निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.10,000/ गट ड वर्ग कर्मचारी वगळून 
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती 
  • नोंदणीकृत व्यावसायिकडॉक्टर,वकील,अभियंता,सनदी,लेखपाल(C.A), वस्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.  

पीएम किसान योजना नोंदणी कशी करावी 


पीएम किसान योजना 2024 ची नोंदणी करण्यासाठी आपण खालील प्रमाणे नोंदणी करावी. 

  • या योजनेसाठी आपण राज्य शासनाने नेमून दिलेल नोडल अधिकारी यांच्या कडे नोंदणी करू शकता. 
  • तलाठी यांच्या कडे चौकशी आणि नोंदणी 
  • सामान्य सेवा केंद्र CSC द्वारा सुद्धा नोंदणी करता येते. 
  • ऑनलाइन PM किसान पोर्टल वर सुद्धा नोंदणी करता येते. 

ऑनलाइन PM किसान योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकरी नोंदणी यावर क्लिक करावे.  

पीएम किसान योजना 2024   :-   शेतकरी नोंदणी


नोंदणीसाठी कागदपत्रे


1) आधार कार्ड 

2) अधीवास प्रमाणपत्र 

3) बँक खाते 

4) रेशन कार्ड नंबर 

5) 7/12 व 8 अ 

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी  e-KYC करून घेणे महत्वाचे आहे. यासाठी आपण खाली दिलेल्या माहिती नुसार  e-KYC  करू शकता. 

e - KYC ऑनलाइन कशी  करावी 

1) ऑनलाइन e-KYC हे शासनाच्या https://pmkisan.gov.in/ या पोर्टलद्वारे करता येते. त्या मध्ये खाली दिलेल्या फोटो प्रमाणे सर्व प्रथम Google वर https://pmkisan.gov.in/ असे टाईप करून सर्च करावे. 


पीएम किसान योजना 2024


2) त्या नंतर PM- Samman Nidhi वर क्लिक करावे. दुसरी विंडो ही ओपन होईल तेव्हा खाली दिलेल्या फोटो प्रमाणे दिसेल. त्या नंतर e-KYC येथे क्लिक करावे. 


पीएम किसान योजना लिस्ट


3)  e-KYC येथे क्लिक येथे क्लिक केल्यानंतर खालील फोटो दिल्या प्रमाणे आपणास OTP Based E-KYC असे लिहलेले दिसेल.त्यानंतर पात्र लाभार्थीने आपला आधार कार्ड क्रमांक दिलेल्या रिकाम्या बॉक्स मध्ये लिहणे गरजेचा आहे. मग त्या नंतर Search या बटणावर  क्लिक करून सर्च करावे. जर तुमची E-KYC आधीच केलेली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. तसे तेथे लिहून येते. पण जर तुमची E-KYC केलेली नसेल तर पुढे Aadhaar Registered Mobile No टाकून त्यानंतर Get Mobile OTP वर क्लिक करावे.त्या नंतर आपण टाकलेल्या मोबईल नंबर वर एक OTP येईल तर तो OTP टाकून Get Aadhar OTP वर क्लिक करावे.


पुन्हा त्या नंतर तुम्हाला आणखी एक OTP हा (OTPआधार कार्ड नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर वर येईल) याची नोंद घ्यावी हा टाकावा लागेल. त्या नंतर Submit येथे क्लिक करावे. 

शेवटी  E-KYC has been done Successfully असे लिहून येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची E-KYC करावी. 


E-KYC केल्यानंतर तुम्ही Know Your Status वर क्लिक करून पुढील माहिती घेऊ शकता. 


PM किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येईल ? 

PM किसान योजने योजनेअंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला होता. तसेच 17 वा हप्ता चार महिन्याचा कालावधी जोडल्यास जे पात्र शेतकरी आहेत त्यांना चार महिन्याचा कालावधी नुसार 17 वा हप्ता हा जून महिन्याच्या आसपास देण्यात येऊ शकतो. 



 धन्यवाद .. 

 

पीएम किसान योजना लिस्ट

पीएम किसान सम्मान निधि चेक मोबाइल नंबर

पीएम किसान योजना 2024

गाँव संबंधी सरकारी योजनाओं की जानकारी

लोकसभा निवडणुक | लोकसभा चुनाव | loksabha election 2024 | महाराष्ट्र


लोकसभा सीट कितनी है

loksabha election date 2024 | loksabha election 2024 | लोकसभा चुनाव 2024 | लोकसभा सीट कितनी है
लोकसभा चुनाव

लोकसभा निवडणूक 2024 जाहीर 


शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले. 

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुका ह्या 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत पार पडतील. तसेच या  निवडणुकीचा निकाल हा 4 जून 2024 रोजी लागेल. 

देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका घेण्यात येणार आहेत. 

  • 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान 
  • 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 
  • 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 
  • 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान 
  • 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान 
  • 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान 
  • 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान 

4 जून रोजी मतमोजणी होईल. 

महाराष्ट्रामध्ये निवडणूक कधी ? 


लोकसभा निवडणुक हे महाराष्ट्रातील 48  मतदार संघासाठी  एकूण  पाच टप्यात मतदान होणार आहे. निवडणुका ह्या महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे रोजी पार पडतील. 


महाराष्ट्रातील निवडणूकीचे टप्पे 

1) 19 एप्रिल पहिला टप्पा 
  • रामटेक
  • नागपुर 
  • भंडारा - गोंदिया 
  • गडचिरोली-चिमूर 
  • चंद्रपूर
2) 26 एप्रिल दूसरा टप्पा 
  • बुलढाणा 
  • अकोला 
  • अमरावती 
  • वर्धा 
  • यवतमाळ - वाशिम 
  • हिंगोली 
  • नांदेड 
  • परभणी 
3) 7 मे तिसरा टप्पा  
  • रायगड 
  • बारामती 
  • धाराशीव 
  • लातूर 
  • सोलापूर 
  • माढा 
  • सांगली 
  • सातारा 
  • रत्नागिरी - सिंधुदुर्ग 
  • कोल्हापूर 
  • हातकणंगले  
4) 13 मे चौथा टप्पा 
  • नंदुरबार 
  • जळगाव 
  • रावेर 
  • जालना 
  • छत्रपती संभाजी नगर 
  • मावळ 
  • पुणे 
  • शिरूर 
  • अहमदनगर 
  • शिर्डी 
  • बीड 
5) 20 मे पाचवा टप्पा 
  • धुळे 
  • दिंडोरी 
  • नाशिक 
  • पालघर 
  • भिवंडी 
  • कल्याण 
  • ठाणे 
  • मुंबई उत्तर 
  • मुंबई उत्तर पश्चिम 
  • मुंबई उत्तर पूर्व 
  • मुंबई उत्तर मध्य 
  • मुंबई दक्षिण मध्य 
  • मुंबई दक्षिण 


गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा | dr. babasaheb ambedkar Jaynti 2024

  

dr. babasaheb ambedkar


रेशन कार्ड ration card धारकांसाठी आनंदाची बातमी .. 


गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी खुश खबर .. 

गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र सरकार ने गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर dr. babasaheb ambedkar यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा हा राज्यात  वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया नुसार अंत्योदय अन्न योजना,प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती (APL) केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना  आनंदाचा शिधा मिळणार आहे. 


कोणत्या वस्तु मिळणार ? 

1 किलो रवा 

1 किलो चणाडाळ 

1 किलो साखर 

1 लिटर  तेल 


राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना,1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील  शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येईल. 


महाराष्ट्र सरकार  

गुढीपाडवा शुभेच्छा


अधिक योजना व माहितीसाठी येथे क्लिक करा -  योजनाची माहिती


 

सुकन्या समृद्धी योजना माहिती sukanya samriddhi yojana

     

गाँव संबंधी सरकारी योजनाओं की जानकारी

सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक योजना 

           मुलींच्या भविष्याची तरतूद 

सुकन्या समृद्धि योजना ही भारत सरकार द्वारा मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीकोनातून  सुरू केलेली एक लघु गुंतवणूक योजना आहे. जी " बेटी बचाव बेटी पढाव " अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. 


1. योजनेचा उद्देश :- 

  •  मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठीच्या खर्चा साठी  या योजनेच्या  बचतीचा  उपयोग होईल  . 
  •  बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. 

2 . लाभ :- 

  •  गुंतवणुकीवर 8.20 %  व्याज मिळेल 
  •  गुंतवलेल्या रक्कमेवर  आयकर कलम 80 सी अंतर्गत सुट 

3. विशेष महत्वाचे  :-

  •  ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 10 वर्षा आतील असणे आवश्यक आहे. 
  •  एक कुटुंबातील दोन मुली ह्या योजनेस पात्र असतील. 
  •  कमीत - कमी रु 250/ जास्तीत -जास्त 1.5 लाख रकमेची एक आर्थिक वर्षात गुंतवणूक करता येते . 
  • मुदत 21 वर्ष असले तरी मुलीच्या लग्नासाठी खाते बंद करता येते व पूर्ण रक्कम ही मिळते.  
  •  मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी 50 % रक्कम ही काढता येते. 
  •  मुदत 21 वर्ष असली तरी खाते उघडल्या पासून 15 वर्षा पर्यंत भरणा करावा लागतो. 

4. अर्ज व कागद पत्रे :- 

  •   सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण स्थानिक बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करावा. 
  •   मुलीचा जन्माचा दाखला , पालकाचे ओळख पत्र 
  •  योजनेचा अर्ज भरून जमा करणे. 




अर्जाची लिंक :- 

https://drive.google.com/file/d/1nex39B9xnBi2zfm111Kmd2oMwj6aYW72/view?usp=drive_link 

सरकारी योजना

मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023


अधिक माहिती साठी जवळील पोस्ट ऑफिस ला भेट द्या.

लेक लाडकी योजना

   लेक लाडकी योजना


लेक लाडकी योजना

मुलीच्या जन्मानंतर तीचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार यांनी लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या जन्मानंतर तीला टप्प्या-टप्प्याने तीच्या सक्षमीकरणासाठी सहाय्य मिळणार आहे.या योजनेमध्ये राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीसाठी अर्ज करता येईल. 

योजनेचे उद्दिष्ट:


लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट हे खालील प्रमाणे आहेत. 
१) मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे. 
२) मुलींचा जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे.
3) कुपोषण कमी करणे. 
4) मुलींचे शाळाबाह्य प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. 


अटी व शर्ती व कागदपत्रे यांच्या आधारे खालील प्रमाणे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कुटुंबातील मुलीना लाभ मिळेले.  

लेक लाडकी योजना फॉर्म



योजनेसाठी लागणारे कागदपत्रे  :- 

  • जन्माचा दाखला 
  • कुटुंब प्रमुखचा १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला. (तहसिलदार किंवा सक्षम अधिकारीचा दाखला)
  • आधार कार्ड (प्रथम लाभासाठी ही अट शिथील राहील)
  • पालकाचे आधार कार्ड 
  • बँकेचे पासबूक झेरॉक्स 
  • रेशन कार्ड 
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभा करिता) 
  • शाळेचा दाखला (संबंधित टप्प्यांचा लाभ घेण्याकरीता) 
  • कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र 
  • अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहित असल्याबाबत लाभ धारकाचे स्वयं घोषणापत्र)

योजनेच्या अटी व शर्ती :- 


  • १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन  मुलींना लागू राहील पण कुटुंब हे पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक असणे गरजेचे आहे. 
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी माता - पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 
  • तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही  मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र त्यानंतर माता - पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 
  • दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या  मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता - पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 
  • या योजनेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे  १ लाखा पेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी साठी अर्ज कुठे कराल ? 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्म घेतलेल्या मुलींची जन्म नोंद ही स्थानिक ग्रामीण व नागरी  स्वराज्य संस्थे मध्ये करणे गरजेचे आहे व त्या नंतर आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या कडे अर्ज सादर करावा. 

तसेच अधिक माहिती साठी :- ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कार्यालय  सोबत संपर्क करा. 

अर्ज डाउनलोड खालील लेक लाडकी योजना फॉर्म येथे करण्यासाठी क्लिक करा. 


ई - श्रम कार्ड कसे काढावे आणि त्याचे फायदे

 



ई - श्रम कार्ड म्हणजे काय ? 

भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती संकलन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मार्फत ई - श्रम पोर्टल हे सुरू केले. असंघटित क्षेत्रातील  ई - श्रम कार्ड साठी सर्व प्रथम ई - श्रम पोर्टल वर आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्या नंतर संबंधित कामगारांना ई - श्रम कार्ड प्रदान करण्यात येते. 

ई - श्रम कार्ड साठी अर्ज कोण - कोण करू शकते 

असंघटित क्षेत्रातील कामगार हे ई - श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील,फेरीवाले, घरकाम,दैनंदिन काम करणारे मजुर,शेतमजूर व इतर. 

वय पात्रता :- वर्ष 16 ते 59 वर्ष 

आवश्यक कागद पत्रे :- आधार कार्ड , आधारकार्ड सोबत मोबईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे, बँक खाते 

महत्वाचे :-

जे कामगार EPFO (Employee Provident Fund Organisation) आणि ESIC (Employees State Insurance Corporation) चे सदस्य असतील तसेच जे आयकर भारतात अश्याना ई - श्रम कार्ड साठी अर्ज करता येत नाही. 

ई - श्रम कार्ड चा फायदा :- 

1) पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे (अपघात विमा संरक्षण) 

2) अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाखा रु  पर्यंत अर्थसहाय्य 

3) अंश कालीन अपंगत्व आल्यास 1 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य 

4)  भविष्य कालीन सामाजिक सुरक्षेच्या योजनाचा लाभ या पोर्टल द्वारे देण्यात येईल. 


ई - श्रम कार्ड साठी अर्ज कसा करावा ? 

ई - श्रम कार्ड काढण्यासाठी खालील पद्धतीचा आपण वापर करावा. 

1) सर्व प्रथम आपणास e shram (https://eshram.gov.in/hi/) अस सर्च करायच आहे.

2) सर्च केल्या नंतर Register on eshram वर क्लिक करावे. 

3) त्या नंतर Self Registration मध्ये आधारकार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा. 

4) त्या नंतर Captcha टाकावा व त्या नंतर तुम्ही  EPFO आणि  ESIC नाहीत म्हणून No हा पर्याय निवडावा आणि त्यानंतर OPT वर क्लिक करावे. 

5) OPT हा आल्यानंतर सबमीट बटणावर क्लिक करावे. 

6) पुढे आधार कार्ड ची माहिती भरून पुढील मार्गदर्शक सुचनांचे पालन करत वैयक्तिक माहिती ही भरावी व जी माहिती विचारली जाईल ती योग्य भरावी. शेवटी तुम्हाला बँक खात्याची माहिती ही भरावी लागेल ती भरून झाल्या नंतर त्याची पुष्टी करावी. त्या नंतर आता पर्यंत जी माहिती भरली आहे ती एकदा तपासून घेणे आणि नंतर जी माहिती भरली आहे ती खरी आहे या वर क्लिक करावे आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर  आपले ई - श्रम कार्ड डाउनलोड करून घ्यावे. 



ई - श्रम कार्ड हेल्पडेक्स  नंबर :- 14434 




महिला सम्मान योजना 2023 माहिती

 महिला सम्मान बचत पत्र योजना  सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक योजना  महिला सम्मान बचत पत्र योजना  महिला सम्मान बचत पत्र योजना  ?  स्वातंत्र्याच...