सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक योजना
मुलींच्या भविष्याची तरतूद
सुकन्या समृद्धि योजना ही भारत सरकार द्वारा मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीकोनातून सुरू केलेली एक लघु गुंतवणूक योजना आहे. जी " बेटी बचाव बेटी पढाव " अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
1. योजनेचा उद्देश :-
- मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठीच्या खर्चा साठी या योजनेच्या बचतीचा उपयोग होईल .
- बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.
2 . लाभ :-
- गुंतवणुकीवर 8.20 % व्याज मिळेल
- गुंतवलेल्या रक्कमेवर आयकर कलम 80 सी अंतर्गत सुट
3. विशेष महत्वाचे :-
- ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 10 वर्षा आतील असणे आवश्यक आहे.
- एक कुटुंबातील दोन मुली ह्या योजनेस पात्र असतील.
- कमीत - कमी रु 250/ जास्तीत -जास्त 1.5 लाख रकमेची एक आर्थिक वर्षात गुंतवणूक करता येते .
- मुदत 21 वर्ष असले तरी मुलीच्या लग्नासाठी खाते बंद करता येते व पूर्ण रक्कम ही मिळते.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी 50 % रक्कम ही काढता येते.
- मुदत 21 वर्ष असली तरी खाते उघडल्या पासून 15 वर्षा पर्यंत भरणा करावा लागतो.
4. अर्ज व कागद पत्रे :-
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण स्थानिक बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करावा.
- मुलीचा जन्माचा दाखला , पालकाचे ओळख पत्र
- योजनेचा अर्ज भरून जमा करणे.
अर्जाची लिंक :-
https://drive.google.com/file/d/1nex39B9xnBi2zfm111Kmd2oMwj6aYW72/view?usp=drive_link
सरकारी योजना मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 अधिक माहिती साठी जवळील पोस्ट ऑफिस ला भेट द्या. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा