लेक लाडकी योजना
मुलीच्या जन्मानंतर तीचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार यांनी लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या जन्मानंतर तीला टप्प्या-टप्प्याने तीच्या सक्षमीकरणासाठी सहाय्य मिळणार आहे.या योजनेमध्ये राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीसाठी अर्ज करता येईल.
योजनेचे उद्दिष्ट:-
लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट हे खालील प्रमाणे आहेत.
१) मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
२) मुलींचा जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे.
3) कुपोषण कमी करणे.
4) मुलींचे शाळाबाह्य प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.
अटी व शर्ती व कागदपत्रे यांच्या आधारे खालील प्रमाणे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कुटुंबातील मुलीना लाभ मिळेले.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-
- जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखचा १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला. (तहसिलदार किंवा सक्षम अधिकारीचा दाखला)
- आधार कार्ड (प्रथम लाभासाठी ही अट शिथील राहील)
- पालकाचे आधार कार्ड
- बँकेचे पासबूक झेरॉक्स
- रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभा करिता)
- शाळेचा दाखला (संबंधित टप्प्यांचा लाभ घेण्याकरीता)
- कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहित असल्याबाबत लाभ धारकाचे स्वयं घोषणापत्र)
योजनेच्या अटी व शर्ती :-
- १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील पण कुटुंब हे पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक असणे गरजेचे आहे.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी माता - पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र त्यानंतर माता - पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता - पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- या योजनेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाखा पेक्षा जास्त नसावे.
या योजनेसाठी साठी अर्ज कुठे कराल ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्म घेतलेल्या मुलींची जन्म नोंद ही स्थानिक ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थे मध्ये करणे गरजेचे आहे व त्या नंतर आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या कडे अर्ज सादर करावा.
तसेच अधिक माहिती साठी :- ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कार्यालय सोबत संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा