Search

E-Shram Card लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
E-Shram Card लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ई - श्रम कार्ड कसे काढावे आणि त्याचे फायदे

 



ई - श्रम कार्ड म्हणजे काय ? 

भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती संकलन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मार्फत ई - श्रम पोर्टल हे सुरू केले. असंघटित क्षेत्रातील  ई - श्रम कार्ड साठी सर्व प्रथम ई - श्रम पोर्टल वर आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्या नंतर संबंधित कामगारांना ई - श्रम कार्ड प्रदान करण्यात येते. 

ई - श्रम कार्ड साठी अर्ज कोण - कोण करू शकते 

असंघटित क्षेत्रातील कामगार हे ई - श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील,फेरीवाले, घरकाम,दैनंदिन काम करणारे मजुर,शेतमजूर व इतर. 

वय पात्रता :- वर्ष 16 ते 59 वर्ष 

आवश्यक कागद पत्रे :- आधार कार्ड , आधारकार्ड सोबत मोबईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे, बँक खाते 

महत्वाचे :-

जे कामगार EPFO (Employee Provident Fund Organisation) आणि ESIC (Employees State Insurance Corporation) चे सदस्य असतील तसेच जे आयकर भारतात अश्याना ई - श्रम कार्ड साठी अर्ज करता येत नाही. 

ई - श्रम कार्ड चा फायदा :- 

1) पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे (अपघात विमा संरक्षण) 

2) अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाखा रु  पर्यंत अर्थसहाय्य 

3) अंश कालीन अपंगत्व आल्यास 1 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य 

4)  भविष्य कालीन सामाजिक सुरक्षेच्या योजनाचा लाभ या पोर्टल द्वारे देण्यात येईल. 


ई - श्रम कार्ड साठी अर्ज कसा करावा ? 

ई - श्रम कार्ड काढण्यासाठी खालील पद्धतीचा आपण वापर करावा. 

1) सर्व प्रथम आपणास e shram (https://eshram.gov.in/hi/) अस सर्च करायच आहे.

2) सर्च केल्या नंतर Register on eshram वर क्लिक करावे. 

3) त्या नंतर Self Registration मध्ये आधारकार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा. 

4) त्या नंतर Captcha टाकावा व त्या नंतर तुम्ही  EPFO आणि  ESIC नाहीत म्हणून No हा पर्याय निवडावा आणि त्यानंतर OPT वर क्लिक करावे. 

5) OPT हा आल्यानंतर सबमीट बटणावर क्लिक करावे. 

6) पुढे आधार कार्ड ची माहिती भरून पुढील मार्गदर्शक सुचनांचे पालन करत वैयक्तिक माहिती ही भरावी व जी माहिती विचारली जाईल ती योग्य भरावी. शेवटी तुम्हाला बँक खात्याची माहिती ही भरावी लागेल ती भरून झाल्या नंतर त्याची पुष्टी करावी. त्या नंतर आता पर्यंत जी माहिती भरली आहे ती एकदा तपासून घेणे आणि नंतर जी माहिती भरली आहे ती खरी आहे या वर क्लिक करावे आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर  आपले ई - श्रम कार्ड डाउनलोड करून घ्यावे. 



ई - श्रम कार्ड हेल्पडेक्स  नंबर :- 14434 




महिला सम्मान योजना 2023 माहिती

 महिला सम्मान बचत पत्र योजना  सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक योजना  महिला सम्मान बचत पत्र योजना  महिला सम्मान बचत पत्र योजना  ?  स्वातंत्र्याच...